Tur Market Price : तुरीचा भाव नरमाला; पहा आज किती मिळाला कमाल भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभावानुसार आज तुरीला (Tur Market Price) सर्वाधिक 8200 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हा दर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 262 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल भाव 8200 आणि सर्वसाधारण भाव 7520 इतका मिळाला आहे.

मागच्या काही दिवसांपासून तुरीला कमाल भाव 8500 रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र तुरीचा भाव (Tur Market Price) आता उतरताना दिसून येत आहे. आजचे बाजार भाव पाहिले असता तुरीला कमाल दर हा 8200 मिळाला आहे. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर 7000 ते 8000 रुपयांच्या दरम्यान आहे.

आज तुरीची सर्वाधिक आवक (Tur Market Price) हे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही आवक 950 क्विंटल इतके झाली आहे याकरिता किमान भाव 6895 कमाल भाव 7985 आणि सर्वसाधारण भाव 7555 इतका मिळाला आहे.

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/08/2022
अहमदनगरक्विंटल13550070005650
पैठणक्विंटल5763176317631
कारंजाक्विंटल950689579857555
वैजापूरक्विंटल3690069006900
मोर्शीक्विंटल402650078007150
मालेगाव (वाशिम)क्विंटल65710078007400
लातूरलालक्विंटल228560081907660
अकोलालालक्विंटल286600081857005
अमरावतीलालक्विंटल3750079007700
यवतमाळलालक्विंटल94680077007250
मालेगावलालक्विंटल28300071006500
चिखलीलालक्विंटल49610075976849
अक्कलकोटलालक्विंटल75660075007000
मुर्तीजापूरलालक्विंटल410747580457725
मलकापूरलालक्विंटल262700082007520
सावनेरलालक्विंटल165700076137500
गंगाखेडलालक्विंटल4720075007200
मेहकरलालक्विंटल120720078007500
नांदूरालालक्विंटल110715080618061
दुधणीलालक्विंटल315727577007490
वर्धालोकलक्विंटल11655074257150
बीडपांढराक्विंटल6610072506818
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल3700070007000

Leave a Comment

error: Content is protected !!