बनवेगिरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ; जी आय मानांकन मिळालेल्या फळपिकाबाबत कृषिमंत्र्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याची चाहूल लागली की , आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणातब बाजारात व्हायला सुरुवात होते. मात्र सध्या महाराष्ट्राच्या जी आय मानांकन मिळवलेल्या हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटकातील आंबा हापूस म्हणून मुंबईत विकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री तर लागतेच मात्र जी आय मानांकन मिळालेल्या फळांबाबत विश्वसार्हता देखील राहत नाही. म्हणूनच अशी बनवेगिरी आता खपवून घेतली जाणार नसल्याचे राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. पणन च्या माध्यमातून अशा फसवेफिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली इतर शेतीमाल विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. वेळप्रसंगी नियमांमध्ये सुधारणा करुन ही कारवाई केली जाणार आहे. तसेच जीआय वाणांची थेट ग्राहकांनाही ओळख पटावी यासाठी जनजागृती केली जाणार आहे. याकरिता एक स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचेही त्यांनी कृषी अधिकारी यांच्या बैठकी दरम्यान सांगितले आहे. ‘जीआय’ प्राप्त कृषीमालाची विक्री करणाऱ्या ऑनलाईन पध्दतीला अटकाव अटकाव घालण्याची तरतूद होती. त्यानुसार नोटीस देऊन कारवाईही करता येत होती. पण आता न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय कारवाई करता येत नाही. त्यामुळे ही अडचण कृषिविभागाने केंद्र सरकारला कळवली आहे. याशिवाय नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याबाबत सूचना द्याव्यात असे मतही कृषिमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

क्यूआर कोडचीही मदत
भौगोलिक मानांकन मिळालेल्या शेतीमालाची ओळख पटवण्यासाठी आता नव्याने क्यूआर कोडचा वापर होऊ लागला आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीसाठी याचा उपयोग सुरु करण्यात आला आहे. यामुळे शेतीमालाची पेरणी कुठे झाली, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत शिवाय जर भौगोलिक मानांकन मिळालेले फळ असेल तर त्याच्या पॅकिंगसोबतच जीआयचे प्रमाणपत्र जोडले जाते. ही पध्दत स्ट्ऱॉबेरी उत्पादकांनी सुरु केली आहे. आतापर्यंत केवळ 10 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून पणन मंडळाने याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!