यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना? : कृषी कायदे रद्दच्या घोषणेवरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देव दिवाळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. मात्र यावरून राजकीय क्षेत्रामधून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय म्हणजे केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

ही मोदी सरकारची खेळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याच्याबद्दल आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याबरोबरच आपल्यामुळेच सहाशे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जीव गेल्याचं मान्य करत पंतप्रधान मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले जाणार तर नाहीत ना? तेव्हा या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी हा फंडा तर नाही ना? असा सवाल करतानाच निवडणुकीआधी महागाई कमी करायचे काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिले त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही असं वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी म्हंटले की , शेतकऱ्यांसाठी काँग्रेस ने ही आंदोलन केलं होतं. कांग्रेस ने समर्थन केलं, रस्त्यावर उतरली आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आम्ही या कायद्याला विरोध केला यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी घातली आंदोलन चिरडण्याचा चे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला शेतकऱ्यांच्या संघर्षाचे यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल दिल्लीतील सरकार जाईल म्हणून सरकारला झुकावे लागेल असं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment

error: Content is protected !!