हॅलो कृषी ऑनलाईन : हल्ली शेतकरी शेतीच्या कामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. पूर्वी शेतात नांगरणी करीता बैलजोडीचा वापर केला जात होता मात्र आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. हा ट्रॅक्टर आपसूकच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महत्वाची जागा मिळवून बसला आहे. शेतकरी नांगरणी आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही. मात्र मोदी सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरु केली आहे. शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात.
अर्धे पैसे सरकारकडून
–केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते.
–यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किमतीत.
–उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात.
–अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.
असा करा मोबाईलवरून योजनेसाठी अर्ज
शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. Hello Krushi या मोबाईल अँपवरून तुम्ही स्वतः आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. शिवाय रोजचा बाजारभाव, जमीनीचा सातबारा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही इथे मोफत मध्ये उपलब्ध आहेत. यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा.
आवश्यक कागदपत्रे
- –विहित नमुन्यातील अर्ज
- –७/१२ चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह)
- –आधार कार्डाची छायांकित प्रत
- –आधार संलग्न बँक खात्याच्या बँक खाते पासबुक छायांकित प्रत
- –जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
- –ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग परवाना
- –हमीपत्र
- –मोबाइल नंबर
लाभ घेण्यासाठी काय कराल ?
–देशातील इच्छुक लाभार्थ्यांना ज्यांना या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50% अनुदान मिळते .
–जर त्यांना या योजनेत अर्ज करायचा असेल तर त्यांनी कृषी विभाग किंवा जवळच्या जन सेवा केंद्रात जावे लागेल.
–जन सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागतो.
–अर्जाचा फॉर्म प्राप्त झाल्यानंतर, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता इत्यादी आपल्याला भरावी लागेल
–आणि नंतर तुमची सर्व कागदपत्रे अर्ज अर्जात जोडा आणि ती जन सेवा केंद्रातच सादर करावी लागतील.
फॉलो करा या स्टेप्स
1: सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी.
2: अर्थसहाय्याचे स्वरूप – ट्रॅक्टर (२० अश्वशक्ती पर्यंत) साठी इतर लाभार्थाना २५ टक्के व अज/अजा/अल्प/महिला यांना ३५ टक्के अर्थसहाय्य दिले जाईल. 3: ट्रॅक्टर व इतर अवजारे करीता जास्तीत-जास्त दिले जाणारे अनुदान खालीलप्रमाणे आहे –
1 : ट्रॅक्टर – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये १०००००/- तसेच इतर लाभार्थी करिता रुपये ७५०००/-
2 : नॅपसॅक/फूट पंप – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये ६००/- तसेच इतर लाभार्थी करिता रुपये ५००/- अनुदान देय आहे.
3 : पॉवर नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर संचालित तैवान स्प्रेअर (क्षमता ८-१० लिटर) – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये ३१०००/- तसेच इतर लाभार्थी करीत रुपये २५०००/-.
4 : शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर अवजारे खरेदी करावीत. देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.