उडिदाला मिळतोय चांगला दर ; सोयाबीनचे दर मात्र चिंताजनक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या सोयाबीन पिकाला मिळणारा दर हा चर्चेचा विषय आहे. मात्र चालू सप्ताहात उडीदला चांगलीच मागणी राहील्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यात दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशभरात उडीदला ३००० ते ८००० रुपये दरम्यान दर मिळाला आहे अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

बऱ्याच भागात उडीदाची काढणी झाली असली तरी अनेक भागात उडदाच्या काढणीचे काम सुरू आहे. त्यात उडीद उत्पादक राज्यात महत्त्वाच्या पट्ट्यात जोरदार पाऊस आला. त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे परिणामी मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. महाराष्ट्रासोबत कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बाजारात आवक होणाऱ्या उडता मध्ये डागी माल किंवा कमी गुणवत्तेचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. तसेच उडदाची मागणीही वाढत आहे. दिल्ली बाजारातून उडदाच्या दरात 25 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात उडदाचे दर सहा हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते. राजस्थान मधील बाजार समित्यांमध्ये चालू सप्ताहात उडदाच्या दरात तेजी मंदीचा प्रभाव होता जयपुर बाजारात उडदाचे दर प्रति क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान राहिले तर केकडी बाजार समितीत उडदाची दैनंदिन अवक 1000 ते 1500 पोत्यांच्या दरम्यान राहिल्या तर दर पाच हजार आठशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान राहिले आहे.

महाराष्ट्रात मात्र उडीद पीक काढणीच्या काळात झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे. अनेक भागात पिकाचा दर्जा खालावला आहे. चांगल्या उडदाला डाळ मिल आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणी वाढत असल्याने गेल्या सप्ताहात दरात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली. या उडदाचे दर बार्शी बाजारात 4000 ते 7000 दोनशे रुपयांच्या दरम्यान होते. दुधनी येथे 5000 ते 7500 रुपये, नगर येथे 4200 ते सात हजार दोनशे रुपये जळगाव बाजार समितीत 5050 ते सात हजार चारशे रुपये आणि लातूर बाजार समिती 4 हजार 600 ते 1200 रुपये दरम्यान उडदाला दर मिळाले

सोयाबीनची स्थिती चिंताजनक

लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या सोयाबीन काढणी कामाला वेग आला आहे. वेळप्रसंगी चिखलात वाट काढत खरीपातील पिकांची काढणी कामे केली जात आहेत. मात्र, बाजारात सोयाबीनचे दर हे वाढत नसल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 5800 रुपये क्विंटल असलेले सोयाबीन 5400 वर आले आहे. शिवाय बाजारपेठेत आवक कमी असतानाही दर वाढत नाहीत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनची पूर्णपणे काढणी, मळणी होऊन आवक वाढली तर काय दर राहतील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर बाजारपेठेत हंगामात दिवसाकाठी 30 ते 40 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. पण यंदा पावसामुळे काढणी कामे रखडलेली होती. आवक कमी झाली तर अधिकचा दर मिळणार हे बाजाराचे सुत्र असताना देखील सोयाबीनच्या दरात मात्र, घट होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!