आधी लसीकरण मगच शेतमाल बाजारात ; नांदेड बाजारसमितीचे फर्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना ची लाट संपली आहे असे वाटत असतानाच आता ओमायक्रोन या कोरोनाच्या व्हेरियंट ने डोके वर काढले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र अद्यापही काही भागात लोक लसीकरण करून घेताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्यांनी देखील लसीकरण पूर्ण करून घ्यावे या उद्देशाने ज्या शेतकऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोसा घेतले आहेत अशाच शेतकऱ्यांना नांदेडच्या बाजारसमितीत प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलाआहे. जर तुम्ही नांदेड कृषी बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा बाजारात शेती मालासोबतच कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे.

लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती मिळावी या उद्देशाने हा नियम लावण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाला बाजार समितीमधील व्यापारी, आडते यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर डोस न घेता केवळ शेतकरीच नाही तर बाजार समितीमधील कर्मचारीही दुकानात आला तरी त्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

केवळ शेतकरी, व्यापारीच नाही तर बाजार समितीच्या आवारात काम करीत असलेले हमाल, मापाडी, मुनिम, महिला कर्मचारी यांनी देखील लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची नियमावली लावूनच लसीकरण वाढविले जाणार आहे. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या उपक्रमात नांदेडकरांनी प्रशासनाच्या हो मध्ये हो मिसळलेला आहे. त्यामुळे ही लसीकरणाची मोहिमही यशस्वा होईल असा आशावाद आहे.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!