सुपर स्टाईलने दूध नेणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल ; आनंद महिंद्रांनीही व्यक्त केली पठ्ठ्याला भेटण्याची इच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, “दूध वितरण करणारा व्यक्ती ‘ असं तुम्हाला म्हंटल की पटकन डोळ्यासमोर एखादी दुचाकी घेतलेला आणि दुधाचे कॅन घेऊन जाणारा व्यक्ती डोळ्यासमोर येईल. मात्र फॉर्म्युला १ मधून दूध घेऊन जाणारा व्यक्ती असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही म्हणाल , छे …! काहीतरीच काय..! पण सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. आता असाच एक फॉर्म्युला १ स्टाईलने दूध नेणाऱ्या युवकाचा व्हिडीओ सध्या व्हरायरल होतो आहे.

हा व्हिडीओ Roads Of Mumbai या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की एक तरुण फॉर्म्युला १ गाडीसारख्या दिसणाऱ्या गाडीतून दुधाचे मोठे कॅन घेऊन वाहतूक करतो आहे. ही गाडी फार काही चांगल्या अवस्थेत नसली तरी ही गाडी चांगल्या पद्धतीने रस्त्यावरून पळू शकते. या गाडीत बसलेला तरुणही फॉर्म्युला वन गाडी चालवताना जया पद्धतीने पेहराव करतात अगदी त्याच पद्धतीच्या पेहरावात बसलेला दिसतो आहे. त्याने काळ्या रंगाचे हेल्मेट घातले असून काळया रंगाचे जॅकेटही घातले आहे.

Roads Of Mumbai या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करीत असताना एक कॅप्शन देण्यात आले आहे. ” जेव्हा तुम्हाला F1 ड्रायव्हर व्हायचे आहे, परंतु कुटुंबाने दुग्ध व्यवसायात मदत करण्याचा आग्रह धरला आहे” तेव्हा अशी गत असते असा सांगण्याचा प्रयत्न या कॅप्शन मधून केला आहे. दुसऱ्या एका व्यक्तींने कार मध्ये बसून हा व्हिडीओ चित्रित केल्याचे दिसत आहे. मात्र हा फॉर्मुला वन स्टाईलने दूध नेण्यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

आनंद महिंद्रांकडूनही कौतुक

या व्हिडिओमधील युवकाचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील कौतुक केले आहे. त्यांनी देखील हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यांनी व्हिडिओमधल्या युवाकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटला कॅप्शन देताना म्हंटले आहे की, ” हे वाहन रस्त्याच्या नियमांचे पालन करते की नाही याबाबत मला खात्री नाही, पण मी खूप दिवसांपासून पाहिलेली ही सर्वात छान गोष्ट आहे. मला या रोड योद्ध्याला भेटायचे आहे…” अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!