गायीलाही व्हर्च्युअलची भुरळ…! चक्क 22 लिटर जास्त दूध देऊ लागली गाय , पहा काय आहे जुगाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , आपल्या शेतात चांगले उत्पादन येण्यासाठी शेतकरी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतात. शेतीसोबत पशुपालन करीत असताना पाश्चात्य देशात म्युजिक थेरपी दिल्याचे तुम्ही ऐकले असेल अशाच पद्धतीने एका पठ्याने आपल्या गायींनी चांगले दूध द्यावे म्हणून गायीला चक्क व्हर्च्युअल रियालिटी गॉगल घालण्याचा प्रयोग केला आहे. आता त्याच्या या अनोख्या प्रयोगाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या नवीन प्रयोगाचा दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला का ? पाहूया…

आम्ही ज्या शेतकऱ्याबद्दल बोलत आहोत तो तुर्की इथला असून त्याचे नाव इज्जत कोकाक असे आहे. या शेतकऱ्याने गायीचे दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी गायीला व्हर्च्युअल रियालिटी गॉगल घातला. यामध्ये सुमधुर संगीत आणि जणू काही आपण मोकळ्या छान वातावरणात चरत आहोत असा भास गायींना होतो. त्यामुळे गायीने चक्क २२ लिटर जास्त दूध दिल्याचे कोकाक यांनी सांगितले.

गायींसाठी खास डिझाईन केले ‘व्हर्च्युअल रियालिटी गॉगल’

हिरवळ आणि बाहेरील वातावरणातील आवाजांनी प्रसन्न झालेली गायीची दूध देक्ण्याची क्षमता कमालीची वाढली आहे. दरम्यान, जे व्हर्च्युअल रियालिटी गॉगल गाईला लावण्यात आले ते खास तयार करुन घेतले गेले आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखील हे नवे आणि खास डिझाईन असलेले गॉगल्स तयार करण्यात आले. त्यानंतर हा अजब प्रयोग करण्यात आला. गायींना लाल किंवा हिरवा रंग दिसत नाही. त्यामुळे त्याप्रमाणे अनेक बदल सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आल्याचंही इज्जत यांनी सांगितले. यासंदर्भातला व्हिडीओ देखील आपण पाहू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!