पिकाच्या उत्पन्नात वाढ हवी आहे ? असे करा सोयाबीन आणि कपाशी पिकातील तण व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतात मुख्य पिकांसोबत उगवणारे तण पिकांसोबत अन्नद्रव्ये, पाणी सूर्यप्रकाश यांसाठी स्पर्धा करतात परिणामी पिकांची वाढ थांबते आणि उत्पन्नात घट दिसून येते. तसेच काही तणे किडी व रोगांचा दुय्यम स्रोत म्हणून काम करतात, त्यासाठी तणांचा योग्य वेळी नियंत्रण केल्यास आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होते.

तण व्यवस्थापन

मशागतीय पद्धती- या पद्धतीमध्ये खुरपणी किंवा कोळपणी या पद्धतींचा समावेश होतो. सोयाबीन मध्ये पहिली खुरपणी २५-३० दिवसांनी व दुसरी फवारणी ४०-४५ दिवसांनी केली जाते. तसेच ह्या मध्ये सायकल कोळप्याचा सुद्धा वापर केला जातो. कपाशी मध्ये लागवडीनंतर २१, ५०, ७५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी केली जाते.

तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर

उगवणीपूर्व तणनाशके- पिकामध्ये उगवणीपूर्वी पेंडीमेथिलिन ३०% ( युपीएल – दोस्त, धानुटॉप, बीएससीएफ -प्लोड) ४०० मिली प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून लागावडी नंतर ३ दिवसांच्या आत फवारावे. सोयाबीन मध्ये डिक्लोसूलाम ८४% दाणेदार ( स्ट्रॉंगार्म-डाऊ) १२ ग्राम किंवा सल्फेन्ट्राझोन १८%+क्लामझोन ३० % ( ऍथॉरिटी – एफएमसी )५०० ग्राम प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पीक उगवल्यानंतर तणनाशकांचा वापर – कपाशीमध्ये पीक उगवल्यानंतर कोणत्याही तणनाशकांचा वापर टाळावा. सोयाबीन मध्ये इमॅझीथायपर ७०% दाणेदार (इमेझ सुपर- पारिजात, ऍडव्हान्स पेस्टीसाईडचे इमेझ-७० किंवा विलोवुड इंडिका ) – ४० मिली + ३०० मिली सर्फेक्टंट २ किंवा इमॅझीथायपर १०% (कृषी रसायन – परफ़ेक्ट, परिमेझ- पारिजात, त्रिंसोल – आयपीएल ) ४०० मिली प्रति २०० ली पाणी किंवा प्रॉपाक्वीझोपॉप २.५ % +इमॅझीथायपर ३.५ (शेकेड – आदामा ) ८०० मिली प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!