Weather Update Today : राज्यात 11 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा ; आज पुण्यासह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाने (Weather Update Today) चांगलाच धडाका लावला आहे. दरम्यान आज हवामान खात्याकडून पुणे ,सातारा रात्नागीरी, रायगड ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागाला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज नाशिक बुलढाणा वाशिम परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर आणि अकोला अमरावती या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

दक्षिण पाकिस्तान आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडेच आहे. राजस्थानच्या जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात पासून ते कर्नाटक पर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा (Weather Update Today) कायम आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे.

राज्यात 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यात पुढील 3 दिवस म्हणजे, 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शनिवार-रविवार मुसळधार पावसाचा (Weather Update Today) अंदाज वर्तवला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!