पुढील चार दिवसात राज्यात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज दिनांक अठरा रोजी कोकण विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप, तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून पालोदी अजमेर ठळक कमी दाबाचे क्षेत्र जमशेदपूर दिघा ते बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्र पासून गुजरात पूर्व राजस्थान ते ठळक कमी दाबाचा क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या उघडीपी मुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. दिनांक १८ पासून पावसाला पोषक हवामान होत असून रविवारपासून विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या भागात पावसाची शक्यता

म्यानमारच्या किनार्‍यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून ही प्रणाली उद्या ओडिसा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 19 सप्टेंबर रविवार पासून पुढचे तीन दिवस काही ठिकाणी गडगडाटी सह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणांचा यात समावेश करण्यात आला आहे. दिनांक 19 सप्टेंबर रोजी नासिक, धुळे, जळगाव आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दिनांक 20 रोजी नागपूर, धुळे, जळगाव, नाशिक, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 21 सप्टेंबर रोजी पालघर, अकोला, अमरावती, वर्धा, आणि नागपूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!