पाऊस पिच्छा सोडेना..! राज्यात पुढील ३-४ दिवस वीज आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागात दिवसभर उन्हाचा चटक्यासह दुपारनंतर वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकत आहे. त्यापासून ओडिसा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच देशाच्या वायव्य भागात सहा ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. रविवारी तारीख तीन सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील आळमनेर, करमाळा, पारोळा येथे प्रत्येकी 50 मिलिमीटर विदर्भातील मुल इथे आठ मिलिमीटर व सावळी ते 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राज्यातील ‘या’ भागाला यलो अलर्ट
दरम्यान, कोकणातील रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला आहे. इथं जोरदार विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!