अलर्ट ! पुढील पाच दिवस राज्याच्या ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 18 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता तर मराठवाडा व विदर्भात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात थंडी कमी झाली आहे. असे असतानाच कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमान 30 अंश याच्यापुढे असून कोकणात उन्हाचा चटका अधिकार बुधवारी १७ रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी 37.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद असलेल्या ढगाळ हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमान 20 अंश यांच्यावर गेलंय. निफाड येथे नीचांकी 16.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

या भागात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्यात पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तर नंदुरबार धुळे जिल्ह्यातही काही भागात पाऊस होईल मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!