Weather Update : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव; राज्यात गारठा कमी, तापमानात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेम्बर महिना सुरु झाला तरी राज्यात अद्याप म्हणावी तशी (Weather Update) थंडी सुरु झाली नाही. सध्याचे हवामान पाहता त्यामध्ये सतत चढ-उतार सुरु आहे. गारठा कमी झाला असून दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवतो आहे. दरम्यान मागील २४ तासात राजस्थानातील चुरू येथे सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात कमाल तापमान सोलापूर येथे नोंदले गेले असून हे तापमान ३३.८ अंश सेल्सिअस इतके आहे.

हवामान स्थिती ?

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभाव, किमान तापमानात (Weather Update) झालेली वाढ, यामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ रविवारपर्यंत (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

कुठे किती तापमान ?(Weather Update)

बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.३ (१४.३), जळगाव ३१.५ (१४.५), धुळे ३१ (११.०), कोल्हापूर ३०.५ (१९.२), महाबळेश्‍वर २७.५ (१४.६), नाशिक ३१.१ (१५.२), निफाड ३१ (११.०), सांगली ३१.२ (१८.२), सातारा २९.६ (१९.३), सोलापूर ३३.८ (१५.८), सांताक्रूझ ३१.८(२०.२), डहाणू २९.८ (१९.४), रत्नागिरी ३२ (२१.७), औरंगाबाद ३१.३ (१२), नांदेड ३०.८ (१४), उस्मानाबाद – (१५), परभणी ३१.२ (१२.६), अकोला ३१.९ (१४.२), अमरावती ३१ (१३.६), बुलडाणा ३० (१४.५), ब्रह्मपुरी ३१.४ (१४.५), चंद्रपूर २८.२ (१४.२), गडचिरोली २९.४ (१२.८), गोंदिया ३० (१२.६), नागपूर ३० (१२.६), वर्धा ३० (१३), यवतमाळ ३२ (१२).

error: Content is protected !!