Weather Update : पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने (Weather Update) विजांच्या काकडाटांसह हजेरी लावली. मात्र आता पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, तसेच कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने
वर्तविला आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत (Weather Update) आला असून, अमृतसरपासून अंबाला, बरेली, मालदा, नागालॅण्ड ते आसामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्राकडे सरकली असून, त्याला लागून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आज कसे असेल हवामान ?

पुणे वेधशाळेच्या हवामान (Weather Update) विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 3 सप्टेंबर रोजी गोवा आणि कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!