Weather Update: राज्यात तापमानाचा पारा किमान 11.2 तर कमाल 36.6अंशांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात (Weather Update) सध्या पहाटे गारठा, धुके, दव अनुभवायला ,मिळत असून दिवसभर मात्र उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. किमान आणि कमाल तापमानात चढ आणि उतार चालूच आहे. दरम्यान मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक किमान ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची, तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज (७) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान स्थिती ?

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली तमिळनाडू पद्दूचेरीकडे येताना आणखी तीव्र (Weather Update) होण्याचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कोमोरिन भागापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पहाटे गारठा, धुके आणि दव पडत आहे. दिवसभर उन्हासह कोरडे वारे वाहत आहेत. राज्यात किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पार गेला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या वरच आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कुठे किती तापमान ? (Weather Update)

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.६ (१२.७)
जळगाव ३४.५ (१४.७)
धुळे ३३ (११.४)
कोल्हापूर ३१.१ (२०.५)
महाबळेश्‍वर २७.२ (१५.५)
नाशिक ३०.९ (१३.४)
निफाड ३०.१ (११.२)
सांगली ३२.२ (२०)
सातारा ३०.९ (१६.९)
सोलापूर ३३.५ (१८.१)
सांताक्रूझ ३६.६(१९.६)
डहाणू ३६.१ (१९.७)
रत्नागिरी ३५.४ (२३.१)
औरंगाबाद ३१.६ (१३.०)
नांदेड ३२.८ (१६.६)
उस्मानाबाद – (१५.४)
परभणी ३२.४ (१४.९)
अकोला ३५ (१८.४)
अमरावती ३४.४ (१६.१)
बुलडाणा ३२ (१७)
ब्रह्मपुरी ३४.९ (१९.२)
चंद्रपूर ३१.६ (१७.२)
गडचिरोली ३२ (१६.४)
गोंदिया ३२.५ (१६.२)
नागपूर ३३.४ (१८.०)
वर्धा ३३.२ (१८.८)
वाशीम ३३.६ (१६.६)
यवतमाळ ३३.५ (१६.५).

error: Content is protected !!