राज्यात आजही ‘या’ भागात बरसणार जोरदार पाऊस , पहा हवामानाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये सध्या खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे यातच राज्यात मान्सून वेळेआधी दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मान्सून महाराष्ट्रात शनिवारी दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे.

महाराष्ट्रातील उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण किनारपट्टी भागातील रायगड, पालघर, ठाणे, मुंबई येथे ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो असं हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.

‘या’ जिल्ह्यात आज पाऊस

दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघर मधलया काही भागात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. तर राज्यात ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये आजही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान पुण्यातही रविवारी मान्सूनचे आगमन झालं होतं मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाला नव्हता शेतीच्या कामांना मात्र वेग आल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!