शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल बदल होऊन केरळ मध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसंच सध्या अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेत ठाण मांडून बसले होते पण सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

केरळ मध्ये येत्या 24 तासात मान्सून दाखल होणार असून महाराष्ट्रात सुद्धा काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचे सावट घोंगावत आहे. आज दुपारपासून पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण याची नोंद झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुढील तीन तास मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

यंदा मान्सून जोरदार बरसणार

भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याची माहिती दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार यंदा कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसा पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!