Weather Update : शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट, आज ‘या’ भागाला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पाऊस (Weather Update) कमी अधिक प्रमाणात हजेरी लावतो आहे. दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडयातील काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. पुणे रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसेल तर विदर्भात विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आस्मानी संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

अनेक ठिकाणी पावसामुळं (Weather Update) जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

आज या भागाला अलर्ट जारी

आज पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे तर बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्‍यता आहे. या भागातही जोरदार पाऊस (Weather Update) होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली असून या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!