Weather Update : राज्यातील काही भागात पावसाच्या सरी तर काही भागात उष्णता राहणार कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तापमानात बऱ्याच अंशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण (Weather Update) झाले असून सोलापूर , लातूर ,नांदेड या भागात जोरदार पावसाने गुरुवारी हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून लाही लाही झालेल्या नागरिकांना दिलासा मिळला. तर वातावरणातही गारवा निर्मण झाला होता. दरम्यान आजही आकाश ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यातही आज हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

येत्या चार आठवड्यात असा असेल पाऊस

येत्या चार आठवड्यात भारतात पावसाची(Weather Update) स्थिती कशी असेल याचाही अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर वर्धित पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावरील वर्धित पावसाची शक्यता दर्शवन्याय आली आहे. दुसरा आठवडा आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कधी बरसणार पावसाच्या सरी?

उत्तर-पश्चिम (Weather Update) आणि मध्य भारतात पुढील ५ दिवस तीव्र उष्णता राहील. उत्तर-मध्य भारतात सरासरी कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज स्कायमेट कडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. मान्सून(Monsoon) वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!