Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पावसाने थोडी उसंत (Weather Update) घेतली असून अधून मधून पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी बरसत आहेत. दरम्यान हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ४,५ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

कोकणातही पावसाचा जोर कमी झाला. काही भागांत जोरदार सरी पडत आहेत. मात्र पाऊस कमी झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी उसंत मिळाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये (Weather Update) पाऊस कमी झाला. त्यामुळे नद्यांची पाणीपातळीही ओसरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने काहीशी उघडीप दिली. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांत हलक्या सरी झाल्या.

आज या भागाला अलर्ट

आज पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाड्यात पावसामुळे नुकसान

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. विभागातील जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना (Weather Update) फटका बसला आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरु केली आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!