Weather Update : पावसाची विश्रांती संपली ! आता ‘या’ भागात जोरदार बरसणार; हवामान खात्याकडून यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसानं राज्यभरामध्ये उसंत घेतली असली तरी येत्या तीन-चार दिवसात राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शनिवार रविवारी थोडा अधिक प्रमाणात पाऊस संभवतो अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यातही 23 आणि 24 तारखेला कोकणात जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

हवामानाची स्थिती

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून त्याच्या सर्वसामान्य स्थितीमध्ये आहे. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची (Weather Update) शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

कोकण घाटमाथा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे मराठवाडा पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

या भागात यलो अलर्ट

आज दिनांक 23 जुलै रोजी नाशिक पुणे पालघर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या भागाला जलो अलर्ट दिला आहे तर हिंगोली नांदेड नागपूर या भागामध्ये विधानसह पावसाची (Weather Update) शक्यता असून याही भागाला आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट मिळालेला आहे तर उर्वरित भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!