हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातील बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मात्र काही भागांमध्ये हलक्या सरी अनुभवायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात हवामानाचा कोणताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही.
कसा असेल सप्टेंबर मध्ये पाऊस ?
हवामान खात्याचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चार आठवड्यांच्या पूर्व पूर्वानुमानानुसार वायव्य भारतातील मान्सूनचा पाऊस (Weather Update) दोन ते आठ सप्टेंबर 2022 मध्ये कमी असण्याची शक्यता आहे. मध्य भारत आणि इतर भागांमध्ये 9 ते 15 सप्टेंबर पर्यंत तो सामान्य पेक्षा किंचित जास्त असू शकतो तर 16 सप्टेंबर च्या पुढे सरासरी इतका असू शकतो अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.
या भागाला अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक 28 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलाय याचबरोबर नांदेड हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या भागाला देखील यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिनांक 29 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे.
तर दिनांक 30 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागासाठी यलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आल्यात या भागांमध्ये विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.