Weather Update : राज्यात बहुतांशी पावसाची उघडीप तर पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यासह राज्यातल्या काही भागात काल (२७) पावसाने (Weather Update) हजेरी लावली. मात्र आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहू शकते. राज्यात आज पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान स्थिती

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निवळताच मॉन्सूनचा आस त्याच्या सर्वसाधारण स्थितीत पोहोचला आहे. बिकानेरपासून, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मॉन्सूनचा (Weather Update) आस दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, त्यापासून रायलसीमापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

हलक्या पावसाचा अंदाज

राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा लपंडाव सुरू आहे. काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने उन्हाचा चटका जाणवला. तर उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले. आज (ता. २८) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची (Weather Update) शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

‘या’ भागाला यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याकडून पूर्व विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!