Weather Update : राज्यातील ‘या’ भागात आज विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात काल पावसाने (Weather Update) उघडीप दिली होती तर काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातल्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

दरम्यान आज २९ आणि पुढचे दोन दिवस राज्यातल्या काही भागात (Weather Update) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यातही पुणे, सांगली , सातारा, सिंधुदुर्ग या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवाण खात्याकडून देण्यात आली आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र इतरत्र ढगाळ वातावरण होते. रायगड आणि पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस (Weather Update) झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. सांगली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात हलक्या पावसाचा शिडकावा अनेक भागांत झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!