Weather Update : राज्यात ऊन सावल्यांचा खेळ ; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी जिल्यांमध्ये पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यातल्या बहुतांशी भागामध्ये पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात देखील तुरळक ठिकाणीच हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत आला. तो पंजाबच्या अमृतसरपासून, आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. छत्तीसगडपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) स्थिती आहे. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) आहे. तर उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

हवामान खात्याकडून आज नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर उस्मानाबाद, नांदेड. या भागाला यलो अलर्ट दिला (Weather Update) असून या भागात आज विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!