Weather Update : राज्यात काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) सध्या उघडीप दिली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र पुणे, सातारा, कोल्हापूर सह काही भागात संध्याकाळनंतर विजांसह पाऊस झाला. दरम्यान आजही काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून, पुढील तीन ते चार दिवस तो उत्तरेकडेच राहणार आहे. हा आस फिरोजपूरपासून ईशान्य भारतातील मिझोरामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा (Weather Update) सक्रिय आहे. तमिळनाडू आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

सोलापूर, सातारा, पुणे, नांदेड, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. आज (ता. ३०) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कुठे किती पाऊस ?

कोकण विभागातील संगमेश्‍वर ४०, ठाणे २०. मध्य महाराष्ट्रातील (Weather Update) माढा ७०, इंदापूर, जावळीमेढा, कर्जत, जेऊर प्रत्येकी ४०, साक्री, पाटण प्रत्येकी ३०, वाई, शिरूर, शाहूवाडी, पाथर्डी, कसबेडिग्रज, दौंड प्रत्येकी २०. मराठवाड्यातील भोकर, अंबड प्रत्येकी ७०, परभणी, उमरी, परांडा, पाथरी प्रत्येकी ३०, हिमायतनगर, पातूर, माणवत, जिंतूर, सेनगाव, भूम प्रत्येकी २० तर विदर्भातील लाखंदूर, झारीझामणी, रामटेक प्रत्येकी २०. मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!