Weather Update : पावसाची उघडीप संपली ! राज्यभरात दमदार एंट्री, आज ‘या’ भागाला अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सलग दोन आठवडे राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर दिनांक ४ ऑगस्ट पासून राज्यात पावसाला (Weather Update) दमदार सुरुवात झाली आहे. राज्यातल्या अनेक भागात पावसाने काल पासून चांगली हजेरी लावली असून आजही राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय

मॉन्सूनचा (Weather Update) आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या बिकानेरपासून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

आज या भागाला अलर्ट जारी

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर भागाला ऑरेंज अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. रायगड, नंदूरबार धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या भागात विजांसह पावसाची शक्यता असून या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!