हुर्रे …! मान्सून अंदमानात दाखल ; आज राज्यातल्या ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशातला शेतकरी ज्याची वाट पाहतो आहे तो मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून (Monsoon 2022)अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.याबाबतची माहिती ट्विटर द्वारे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

आसाममध्ये मुसळधार पाऊस

आसाममध्ये पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. अनेक गावांमध्ये पुराबरोबरच भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पुरामुळे आसाममधील तब्बल 57,000 स्थानिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.आतापर्यंत या पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

कसे असेल राज्यात तापमान ?

दरम्यान राज्यात अद्यापही उन्हाचा तडाखा कायम आहे. राज्यातल्या अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर पोहचलेले आहे. हवामान खात्याकडून नोंदवलेल्या निरीक्षणानुसार दिनांक १६ मे रोजी सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील अकोला येथे नोंदवण्यात आले आहे. हे तापमान ४४. १ अंश सेल्सिअस असे नोंदवण्यात आले आहे. त्याखालोखाल अमरावती येथे ४३. ६ आणि वाशीम येथे ४३.५, वर्धा येथे ४३. २ अंश सेल्सिअस तापमानचाही नोंद करण्यात आली आहे. पुढील 5 दिवस, भारतीय हवामान खात्याने ने द. कोकण, द. मध्य महाराष्ट्र आणि द. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा(Monsoon 2022) इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

17 मे : आज दिनांक 17 मे रोजी वाशिम, परभणी ,नांदेड ,लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा ,सांगली ,कोल्हापूर ,चंद्रपूर, गडचिरोली ,यवतमाळ ,पुणे या भागांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून त्यामुळे या भागांना यलो अलर्ट आजच्या दिवशी देण्यात आला आहे. आज अकोला आणि अमरावती मध्ये मात्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

18 मे : उद्या दिनांक 18 मे रोजी परभणी, हिंगोली ,नांदेड, लातूर ,सोलापूर ,सातारा आणि कोल्हापूर सांगली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अकोला आणि अमरावती उष्णतेची लाट कायम राहणार आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये पावसाची शक्‍यता आहे.

19 मे : दिनांक 19 मे रोजी सातारा, सांगली ,सोलापूर, उस्मानाबाद, लातूर ,परभणी ,नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस(Monsoon 2022) हजेरी लावण्याची शक्यता आहे तर पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!