Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यभरात पावसाने दमदार हजेरी (Weather Update) लावली आहे. राज्यातल्या काही भागात विजांसह जोरदार पावसाना हजेरी लावली. दक्षिण कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा पूर्व विदर्भ या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभाग कडून देण्यात आली आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे (Weather Update) सरकला आहे. राजस्थानच्या बिकानेरपासून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. झारखंड आणि परिसरावर, कर्नाटक आणि परिसरावर तसेच राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहेत. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

या भागाला अलर्ट जारी

आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्हा सह कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे या भागात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर ठाणे नाशिक उस्मानाबाद पालघर लातूर नांदेड नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या चिलामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तर विदर्भात विधानसह पावसाचा अंदाज आज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!