Weather Update : उद्यापासून राज्यात वाढणार पावसाचा जोर; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) हजेरी लावतो आहे. दरम्यान आज हवामान खात्याकडून राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय येत्या दोन दिवसात राज्यातल्या विविध भागात वादळी पाऊस पडणार असून राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान एका आठवड्याच्या अंतरानंतर मान्सून पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याचे चित्र दिसून येत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. नव्या तयार झालेल्या वातावरणीय रचनेनुसार ओडिसा, मध्य भारत, गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटका या राज्यांमध्ये पुढच्या आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

हवामान विभागाचे तज्ञ् के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबरच्या सुमारास पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ (Weather Update) निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतरचे ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसांकरिता हवामान खात्याने अलर्ट जरी केला आहे. शुक्र/शनि उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज या भागाला यलो

आज दि. ७ सप्टेंबर रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला असून या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!