आज राज्यातल्या ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी ; मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून काही प्रमाणात सुरुवात केली आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आज दिनांक 18 रोजी कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 राज्यात वाढणार पावसाचा जोर

मान्सूनचा असलेल्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपुर, दिल्ली, हर्दोई, वाराणसी, देहरी, रांची यादरम्यान आहे. ओडीसा आणि बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. हे क्षेत्र दक्षिण ओरिसा, उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा येत्या दोन दिवसात चक्राकार वारे मध्ये रूपांतर होण्याची स्थिती असून ते वायव्येच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज खान्देश व मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी अधिक स्वरूपात राहिल.

जळगावात तापमान 36 अंश सेल्सिअस

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या उघडीपी मुळे राज्यात उन्हाचा चटका वाढलेला होता. तापमानाचा पारा गेले काही दिवस सातत्याने 26 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. मंगळवारी दिनांक 17 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जळगाव येथे सर्वाधिक 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

येत्या दोन दिवसात येथे बरसतील पावसाच्या सरी

राज्यात गुरुवारी पालघर, अमरावती, नागपूर आणि उर्वरित संपूर्ण राज्यात तुरळक सरी कोसळतील. शुक्रवारी, शनिवारी संपूर्ण राज्यात तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!