गाजर गवताचा नायनाट करण्यासाठी मित्र कीटकाची मदत ; जाणून घ्या काय आहे हा उपाय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो गाजर गवत आपल्या सर्वांना परिचयाचे आहेच. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचारोग, ऍलर्जीं होते तर जनावरांनी हे गवत खाल्ल्यास दुधाला कडवटपणा येतो. याच्यावर महागडी तणनाशके फवारून त्याचा नायनाट केला जातो. मात्र आज आपण अशा एका मित्रकीटकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे गाजर गवतावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल.

जैविक नियंत्रण पध्दतीनुसार मेस्किकन भुंगे म्हणजेच झायगोग्रामा बायकोलरॅटा या मित्रकिटका द्वारे गाजर गवतावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. चला तर मग पाहुयात वसंराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शइफारशीनुसार गाजर गवताचे नियंत्रण कसे करायचे.

कसे आहे मेक्सिकन भुंग्याचे जीवनचक्र ?

मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ भुंगे मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे वेगवेगळे अथवा गुच्छ स्वरुपात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. त्यामुळए झाडांची वाढ आणि फुले येण्याचे थांबते. अळी अवस्था दहा ते अकरा दिवसांची असते. तर कोष अवस्था नऊ ते दहा दिवसांची असते. कोष अवस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात. पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. एखाद्या वातावरणात स्थीर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.

भुंगे कोठे आणि किती सोडावेत ?

प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडावेत. नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील पाचशे ते हजार भुंगे पकडून ते दहा-पंधरा सेंटीमीटर उंच प्लास्टिकच्या बाटलीत टोपणाला जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकावा. भुंगे आणि अळ्या फक्त गाजर गवतच खातात. गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्त अवस्थेत जातात.
झायगोग्रामा भुंग्याचा मनुष्य व प्राणिमात्राला त्रास होत नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करु नयेत. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करावेत. प्रयोगशाळेत प्लास्टिकच्या सहा बाय नऊ इंच आकाराच्या डब्यात किंवा दहा बाय पंधरा फूटआकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजरगवतावर भुंग्यांचे गुणन करतात.

नियंत्रणाचे इतर उपाय काय आहेत?

१०० लिटर पाण्यात २० किलो खडे मिठ घालून केलेले द्रावण गाजर गवतावर फवारावे. तरोटा ही वनस्पती सुध्दा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात. या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!