काय सांगता ! मानवी मूत्रावर चालणार ट्रॅक्टर ? कसं ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये देखील आता नवनवीन बदल होत असून मशिन्स च्या साहाय्याने शेती केली जाते. बैलगाडीची जागा ट्रॅक्टर ने घेतली आहे. मात्र वाढत्या इंधन दरामुळे ही यंत्रे देखील परवडत नाहीयेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधण्यात जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशातच मानवी मूत्रावर चालणारा ट्रॅक्टर बनवण्यात येतोय… हे ऐकून विचित्र वाटत असले तरी हे खरंय…

आता तुम्ही म्हणाल काहीतरीच काय ? मानवी मूत्राचा इंधन म्हणून कसाकाय वापर होऊ शकतो ? तर … मानवी मूत्राचा थेट इंधन म्हणून वापर केला जाऊ शकत नसला तरी मूत्रामधील अमोनियामधून ऊर्जा निर्माण करून त्यावर प्रक्रिया करून त्याचा इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. अमेरिकेतील एका कंपनीने पेट्रोल आणि डिजेलला पर्याय म्हणून लघवीवर चालणारे ट्रॅक्टर तयार केले आहे.वास्तविक, अमेरिकन कंपनी अमोगीने अमोनियावर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. तसे पाहाता आपल्या मूत्रात अमोनिया मुबलक प्रमाणात आढळतो.

अमोनियातून निर्माण केली जाणार ऊर्जा

कंपनीने असा रिएक्‍टर बनवला, तो अमोनियाला तोडतो आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला जातो . म्हणजेच, हे स्पष्ट आहे की, आपण ट्रॅक्टर किंवा इतर कोणत्याही वाहनाच्या टाकीत लघवी टाकली तर ते चालू होणार नाही, परंतु यावर प्रक्रिया करुन ते इंधनासाठी वापरण्या योग्य होईल.
डीडब्ल्यूने आपल्या अहवालात सांगितले आहे की, लघवीचे अमोनियामध्ये रूपांतर करता येते, त्यातून ऊर्जा निर्माण करता येते. कंपनीने सध्या ट्रॅक्टरसह हा प्रयोग केला आहे, परंतु भविष्यात यावर सागरी मालवाहू जहाजे चालवायची असल्याचा कंपनीचा प्लान आहे.

कार्बनमुक्त वाहतूक शक्य

अनेक दशकांपासून उद्योगात अमोनियाचा वापर केला जात असल्याने, त्याच्या साठवणुकीसाठी आधीच पुरेशी व्यवस्था आहे. त्याच्या हाताळणी आणि वितरणासाठी साधने आधीच उपलब्ध आहेत. अमोनिया कार्बन डाय ऑक्साईड सोडत नसल्यामुळे आणि भरपूर ऊर्जा असल्याने, कार्बनमुक्त वाहतुकीसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!