एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीन बाजारभावात काय झाला बदल ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी केवळ दहा बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजार भाव प्राप्त झाले आहेत. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 336 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता 6501 किमान भाव, सात हजार चारशे रुपये कमाल भाव आणि 7150 सर्वसाधारण भाव मिळाला आहे. तर आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1067 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमाल भाव 7280 रुपये राहिला.

सोयाबीनचा सर्वसाधारण भाव हा सात हजार 300 रुपयांपर्यंत राहिला. सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हंगामाच्या शेवटी हे बाजार भाव सात हजार हुन अधिक रुपयांवर स्थिर राहिलेले दिसून येत आहेत. मध्यंतरी सोयाबीनचे बाजार भाव हे सहा हजार रुपयांवर आले होते. मात्र रशिया युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळापासून सोयाबीनच्या दरात अचानक वाढ झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत सोयाबीनचे भाव 7 हजार रुपयांच्या वर स्थिर आहेत. मात्र राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल यापूर्वीच विकला आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या मालाची साठवणूक केली असून त्यांच्याकरिता हा सोयाबीनचा बाजारभाव फायदेशीर ठरू शकतो.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 4-1-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2022
औरंगाबादक्विंटल31600070006500
शिरुरक्विंटल1690069006900
राहताक्विंटल4720072847250
सोलापूरलोकलक्विंटल22650072507205
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल68614173767325
जालनापिवळाक्विंटल336650074007150
अकोलापिवळाक्विंटल1067600072806900
वर्धापिवळाक्विंटल4600065006350
भोकरपिवळाक्विंटल41711171517131
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल131680071006950

Leave a Comment

error: Content is protected !!