‘या’ आठवड्यात कसे असेल हवामान ? कुठे पाऊस तर कुठे तापमानात चढ -उतार , जणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झालाय. 5 ते 11 नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्‍यता आहे. तर कमाल आणि किमान तापमानात देखील उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

5-11 नोव्हेम्बर दरम्यान या भागात पावसाची शक्यता

28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्यात दक्षिणेकडील भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले. अखेरच्या टप्प्यात सांगली आणि सोलापुरात तुरळक पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे गारठा कमी झाला तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात ही वाढ झाली आहेअरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला राज्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाच ते 11 नोव्हेंबर या आठवडाभर यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता यात कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘या’ भागात तापमानात घट

राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असल्याने तापमानात वाढ झाली आहे. यात उन्हाचा चटका जाणवतोय 5 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यातही उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्याच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत चार ते सहा अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या आठवडाभरात गारठा कमी झालाय किमान तापमानाचा विचार करता 5 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किमान दोन अंशांनी कमी तर कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान दोन अंशांनी अधिक राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!