सोलापूर ठरतंय का कांद्याचं ‘नेक्स्ट हब’ …! काय आहे आजचा कांदा बाजारभाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची चांगली आवक होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज लाल कांद्याला सर्वाधिक 3200 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. खरेतर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजरपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओलाखाली जाते. मात्र मागचे काही दिवस पाहता. सोलापूर बाजार समिती कांद्याचे ‘नेक्स्ट हब’ होते की काय अशी अवस्था सध्याची कांदा बाजारपेठ पाहून वाटते आहे.

खरेतर राज्यामध्ये लासलगाव नंतर सोलापूर कांदा बाजारपेठ ही 2 नंबर बाजारपेठ म्हणून गणली जाते. मात्र मागचे काही दिवस पाहता सोलापूर बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक होताना दिसते. काही दिवसांपूर्वी 11 जानेवारी रोजी सर्व रेकॉर्ड मोडत सोलापुरात 1 लाख 5 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. सध्याचे सोलापूर बाजारातील चित्र बघता सर्वाधिक आवक दिसून येत आहे. आजच्याच आवकेबद्दल बोलायचे झाले तर आज सोलापूर बाजारात 55,955 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तर लासलगाव बाजारसमितीत 14250 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

याबाबत ‘हॅलो कृषी’ शी बोलताना सत्यम कंपनीचे सादिक बागवान यांनी सांगितले की, “आम्ही 1996 पासून या व्यवसायात आहोत. आतापर्यंतचे चित्र बघता लासलगाव नंतर कांदा व्यापार मध्ये सोलापूर बाजाराचा दुसरा क्रमांक लागतो. शेतकऱ्यांची सोलापूर बाजारपेठेला अधिक पसंती आहे. सोलापूर आणि आसपासच्या भागातून येथे शेतकरी आपला कांदा घेऊन येत असतात. शिवाय ही बाजारपेठ बाराही महिने सुरु असते. सध्या या बाजारसमितीत दरही चांगला मिळतो आहे त्यामुळे शेतकरी सोलापुरातील कांदा मार्केटला अधिक पसंती देतात.” अशी माहिती त्यांनी दिली.

सोलापूर आणि लासलगाव बाजार समितीतील मागच्या तीन दिवसातील तुलनात्मक दर

दिनांक -बाजारसमिती -आवक(क्विंटल) – कमाल दर

१९-१-२२- सोलापूर -55955 – 3200
१९-१-२२-लासलगाव -14250- 2525

१८-१-२२-सोलापूर-45158-3500
१८-१-२२-लासलगाव -26372-2455
१८-१-२२-लासलगाव विंचूर -22965-2424

१७-१-२२-सोलापूर-52440-3250
१७-१-२२-लासलगाव-23980-2391
१७-१-२२ लासलगाव – निफाड-2540-2155
१७-१-२२ लासलगाव – विंचूर-20415- 2411

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 19-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/01/2022
कोल्हापूरक्विंटल473880030001200
औरंगाबादक्विंटल83140020001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल12631180030002400
खेड-चाकणक्विंटल5000100025001800
साताराक्विंटल223100030002000
मंगळवेढाक्विंटल7833031602000
कराडहालवाक्विंटल123150020002000
सोलापूरलालक्विंटल5595510032001800
येवलालालक्विंटल1700035024512000
येवला -आंदरसूललालक्विंटल800050025002100
लासलगावलालक्विंटल1425090025252000
उस्मानाबादलालक्विंटल650020001250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1300052523702100
नागपूरलालक्विंटल14007001100950
पैठणलालक्विंटल51090023501500
मनमाडलालक्विंटल700030024162100
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल436050021881881
भुसावळलालक्विंटल11150015001500
देवळालालक्विंटल754060025002175
उमराणेलालक्विंटल1550090025002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल32070021001400
पुणेलोकलक्विंटल1574760030001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100020001500
कल्याणनं. १क्विंटल3150025002000
नागपूरपांढराक्विंटल1400200025002375
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल261180025002000
चांदवडउन्हाळीक्विंटल10200140021912000
राहताउन्हाळीक्विंटल317265030502600

Leave a Comment

error: Content is protected !!