Wild Animals : पिकांमध्ये जंगली प्राण्यांचा हैदोस वाढलाय; करा ‘हा’ घरगुती उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा (Wild Animals) (हरीण, नीलगाय, रानडुक्कर) नेहमीच खूप त्रास होतो. हे प्राणी पिकांना खातात कमी आणि नुकसानच अधिक करतात. अशी शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते. मात्र शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील या प्राण्यांपासून होणारे तुमच्या पिकांचे नुकसान टाळू शकतात. ज्याद्वारे तुमचे होणारे आर्थिक नुकसान टाळले जाऊ शकते. आज आपण शेतीमध्ये जंगली प्राण्यांचा (Wild Animals) सुळसुळाट झाल्यास काय उपपाययोजना कराव्यात. जेणेकरून हे प्राणी शेतामध्ये येऊन तुमच्या पिकाचे नुकसान करणार नाहीत. याबाबत जाणून घेणार आहोत.

कमी खर्चात घरगुती उपाय (Wild Animals Attacks On Crops)

देशातील काही राज्यांमध्ये जंगली प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतीचे नुकसान होऊ नये. म्हणून तार कुंपण अनुदान योजना राबवली जाते. मात्र तार कुंपणाच्या तारांना अडकून प्राण्यांचे मृत्यू होत असल्याने काही राज्यांनी यास बंदी घातली आहे. महाराष्ट्रात जंगली भागांमध्ये शेतीचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ही योजना ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेद्वारे तुम्ही शेताच्या तार कुंपणासाठी अनुदान मिळवू शकतात. मात्र ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या लाल फितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा वेळेत लाभ मिळेलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे आपल्याकडे अशा अनेक घरगुती वस्तू असतात. ज्यांचा वापर करून शेतकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करू शकतात.

हेही वाचा : जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होतीये; वापरा ‘हा’ गोमुत्राचा जुगाड! (https://hellokrushi.com/wild-animals-crops-destroyed-use-gomutra-jugad/)

जुन्या साड्यांचा उपाय

मागील भागात आपण “जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होतीये; वापरा ‘हा’ गोमुत्राचा जुगाड!” हा एक देशी जुगाड पाहिला. जो पीक संरक्षण संशोधकांनी विकसित केला असून, तो जंगली प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. मात्र शेतकरी आपल्या घरी उपलब्ध असलेल्या जुन्या साड्या वापरून आणखी एका पद्धतीने देखील पिकांचे संरक्षण करू शकतात. यासाठी तुम्हाला जुन्या साड्या सहज उपलब्ध होतील. किंवा बाजारातही अशा जुन्या सहज मिळतात. या साड्या तुम्ही बांधावर ठिकठिकाणी लाकूड उभे करून त्याला बांधू शकतात. वाऱ्याच्या झोतामुळे सतत हलणाऱ्या या साड्यांमुळे हरीण, रानडुक्कर आणि नीलगाय यांनी कोणीतरी मानव पिकाजवळ उपस्थित असल्याचे जाणवते. ज्यामुळे हे प्राणी पिकाजवळ फिरकत नाहीत. जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा उपाय कमी खर्चात आणि एकदम सहजरित्या होत असल्याने, तो रामबाण उपाय मानला जातो. या साड्यांचा उपाय अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आला आहे.

error: Content is protected !!