खाद्यतेलाच्या किंमती येणार नियंत्रणात? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच या किमतींमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीमध्ये खाद्यतेल आयातीवर लावण्यात आलेले कर कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो अशी माहिती काही माध्यमांनी दिले आहे.

दरम्यान आयात केलेल्या पाम तेलावर 17 टक्के तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावर जवळपास २० टक्के कृषी सेस आकारला जातो. असेच कर कमी केल्यास खाद्य तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. केंद्र सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवा कायदा वापरून सरकार तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. खाद्य तेलाचा साठा करण्यावर मर्यादा घालून बाजारातील तेलाची उपलब्धता वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांना खाद्यतेलाच्या साठा किती आहे याबद्दल विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र काही तज्ञांच्या मतानुसार सरकारने हे पाऊल उचलू नये कारण खाद्य तेलाचा साठा करण्याची मर्यादा निश्चित केल्यास याचा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

खाद्यतेलाच्या दारात वाढ

पाम तेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमीच असतात मलेशिया मधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क 15 टक्के होता त्यात थेट दुप्पट वाढ होऊन 30 टक्के झाले आहे. त्यामुळे पाम तेलाचे भाव वाढले. गेल्यावर्षी खाद्यतेलाचे भाव 95 ते 100 रुपये प्रतिकिलो असलेले सोयाबीन तेल सध्या 175 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय गेल्या वर्षी शेंगदाणा तेल 120 रुपये प्रति किलो मिळत होते. आता 190/ 195 वर जाऊन पोहोचले आहेत. 130 रुपये प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल 180 ते 185 रुपयांना विकत घ्यावं लागत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!