‘यास’ चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 21 मे रोजी बंगालची खाडी आणि अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला आहे. मात्र सध्या आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातमध्ये निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

भारतातील जवळपास 40 टक्के शेतकरी आजही मान्सूनच्या भरवशावर शेती करतो. येत्या 31 मे किंवा 1 जूनला मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र या चक्रीवादळामुळे मान्सून पोहोचण्यास विलंब झाल्यास शेती आणि शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात विविध ठिकाणी खरीप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे मान्सूनचा पाऊस विलंब झाल्यास पेरणी लांबू शकते परिणामी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये मान्सूनचा पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांकडून जलसिंचनाची साधन नसल्याने त्यांना याचा काही फटका बसण्याची शक्यता आहे पंजाब, यूपी, हरियाणा, बिहार मधील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने त्यांचं मान्सून पावसावरील अवलंबित्व कमी झाले आहे.

राज्यातील या भागात पाऊस 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी च्या चांगल्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी जोरदार वारे वाहत असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून खरिपाची पूर्वतयारी सुरू असताना पूर्व मोसमी पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान मागील 24 तासात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथं 42.5अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!