ड्रॅगन फ्रुटपासून बनवली वाईन! ‘या’ महिलेने लाँच केला आपला ब्रँड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
हॅलो कृषी ऑनलाईन । ड्रॅगन फ्रुट हे फळ सध्या काही ना काही कारणाने चर्चेत येते आहे. काही दिवसापूर्वी या फळाचे नाव कमळ असे ठेवण्यात आले आहे. निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती असलेले हे फळ कॅक्टासी या कुळातील असून या फळाचे शास्त्रीय नाव Hylocere usundatus असे आहे. कटीबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका येथून या फळाचे मूळ आहे. सध्या भारतातही याची लागवड होते आहे. नागालँड मधील लूसी एन गुली (Lucy Ngullie) या महिलेने आता या फळाची वाईन बाजारात आणली आहे. नागालँड मधील दिमापूर येथील या महिलेने सेंद्रिय ड्रॅगन फ्रुट वाईन बाजारात आणून एक नवा व्यवसाय सुरु केला आहे. सध्या तिच्या या व्यवसायाची सर्वत्र चर्चा होते आहे.

 

लूसी यांनी नागालँड मधील स्थानिक व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी  ‘ड्रीम ड्रॅगन फ्रुट फार्म’ स्थापन केले आहे जिथे संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने या फळाचे उत्पादन घेतले जाते. आणि नंतर या फळाची वाईन कोणत्याही रसायनाशिवाय बनवली जाते. वाईन हे पेय मुख्यतः द्राक्षापासून बनवले जाते. ड्रॅगन फ्रुट पासून एक नाविन्यपूर्ण वाईन आता बाजारात आणली जात आहे.  “ड्रॅगन फ्रुट’’ हे मधुमेह, संधिवात, कर्करोग, दमा इत्यादी आजार नियंत्रित करणे, शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करणे, अन्नपचन शक्ती वाढवणे, या साठी उपयुक्त आहे.

 

लूसी यांच्या सेंद्रिय शेतातील ही वाईन पूर्णतः सेंद्रिय असून ती २ वर्षे जुनी आहे. सध्या या वाईनचे दोन प्रकार त्यांनी उपलब्ध केले आहेत. रेड वाईन आणि व्हाईट वाईन असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. हळूहळू स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देत एकमेकांना मदत करत हा व्यवसाय मोठा करण्याचे आणि चांगले उत्पन्न मिळविण्याचे ध्येय असल्याचे त्या सांगतात.

Leave a Comment

error: Content is protected !!