राज्यात बैलगाडा शैर्यतीला परवानगी मात्र ‘या’ असतील अटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुन्हा धुराळा उडणार …! आखेर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शैर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. खासदार अमोल कोल्हे, काही संस्था आणि नेत्यांनी बैलगाडा शैर्यती सुरु व्हाव्यात याकरिता मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा केला होता त्या लढ्याला आता यश आले आहे असे म्हणावे लागेल. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे केवळ शैर्यतीसाठी जोपसल्या जाणाऱ्या खिलार बैलांच्या विकासाला पुन्हा बळ मिळेल यात शंका नाही.

काय असतील अटी?

–या निकालानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली.

–कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांचं पालन करुन शर्यती आयोजनाला परवानगी

–बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल

–शर्यतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागणार

–शर्यतीदरम्यान बैलांना क्रूरपणे वागणूक देता येणार नाही

–राज्य सरकारनं केलेल्या नियमावलींचं पालन करावं लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!