लेमन ग्रास ची शेती करून मिळवू शकता मोठा नफा; जाणून घ्या कसे ते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन। सध्याच्या काळात शेतकरी विविध प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन पिकांचे प्रयोग करताना दिसत आहेत. ज्यातून त्यांना चांगला नफाही मिळतो आहे. असेच एक पीक म्हणजे लेमन ग्रास होय. याचा वापर बहुतांशी कॉस्मेटिक, डिटर्जंट, आणि औषधांमध्ये केला जातो. कमी कालावधी मध्ये तयार होणाऱ्या या पिकाला सध्या चांगली मागणी आहे. औषधी वनस्पती असल्याने याचे बरेच उपयोग आहेत. योग्य तंत्राचा वापर करून या पिकाची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो. तसेच यासाठी लागणारी गुंतवणूकही कमी असते.

याची लागवड केल्यानंतर चार महिन्यांमध्येच हे पीक तयार होते. औषधांसोबतच या पिकापासून बनवलेल्या तेलाला देखील बाजारात चांगली मागणी आहे आणि किमतही चांगली मिळते. या पिकाच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकासाठी कोणत्याही प्रकारच्या खताची आवश्यकता भासत नाही. आणि हे पीक एकदा पेरले की पाच ते सहा वर्षापर्यंत ते चालते. याची पेरणी फेब्रुवारी ते जुलै च्या दरम्यान करता येते. एकदा याची पेरणी केली की, पाच ते सहा वेळा याची कापणी करता येते. यापासून तयार केल्या जाणाऱ्या तेलाची किंमत हजार ते दीड हजार रु लिटर अशी असते. एका एकरातून साधारण ५ ते ६ लिटर तेल निघते.

गणिती रुपात हिशोब करायचा झाल्यास याच्या लागवडीसाठी ३० ते ४० हजार रु. खर्च येतो आणि एका वर्षात ३ ते ४ वेळा याची कापणी करता येते. म्हणजे साधारण वर्षाकाठी १ ते दीड लाख रु. इतके उत्पादन या पिकातून मिळते. त्यामुळे जर कमी कालावधीत चांगला नफा मिळवायचा असेल तर लेमन ग्रास ची शेती करायला हरकत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!