तुम्हीही सुरु करा प्रक्रिया उद्योग, ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाडा’ उपक्रमाचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार कडून कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग’ ही खास योजना राबवली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये या योजनेचा उपक्रम पार पडतो आहे. या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने 3 ते 18 जानेवारी या कालावधीत ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजूरी पंधरवाडा’ आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात प्रकल्पाच्या आराखडा तयार करण्यापासून बँक कर्ज मंजुरी मिळेपर्यंतच्या प्रक्रियाविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.

कांदा या पिकाचा समावेश
–नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्याचे ठरवले आहे.
— नाशिक जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन या घटकांमध्ये कांदा पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
–या पिकाच्या उद्योगासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यापासून ते बॅंक कर्ज मंजुरी या प्रक्रियेस गती देण्याचा उद्देश या पंधरवाड्यात केला जाणार आहे.

कुठे कराल अर्ज किती मिळेल अनुदान ?
कृषि प्रक्रिया उद्योगासाठी इच्छूक उमेदवारांना वैयक्तिक सूक्ष्म प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंट, पायाभूत सुविधा, ब्रॅंडिंग व विपनण, क्षमाता बांधणी व संशोधनासाठी प्रशिक्षण संस्थांना प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. एवढेच नाही तर या योजनांसाठी http://pmfme.mofpl.gov.in व अॅप्लिकेशनसाठी http://pmfme.mofpi.gov.in/mis/#login या वेबसाईटवर योजनेची माहिती घ्यावी लागणार असल्याचे आवाहान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत उमेदवारांना वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतचे अनुदान मिळणार आहे. यामध्ये सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट यांना उद्योगाशी निगडीत प्रकल्पही याकिरता पात्र असणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यासाठी फायद्याची राहणार आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!