Agriculture Business । घरच्या घरी कमी जागेमध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी, गृहिणी, छोटे व्यावसायीक गोल्डफीश (सोनेरी मासे) पालनाकडे वळत आहेत. गोल्ड फिशला बाजारात चांगली मागणी आहे. अनेक लोक असे मानतात आहे, की बाहेर प्रवासाला निघताना गोल्ड फिशचे दर्शन घेतल्यास प्रवासात अडचणी येत नाहीत. त्यामुळे शहरी भागात गोल्ड फिश पालन करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
एका खोलीतून सुरू करता येणारा व्यवसाय
भारतात गोल्ड फिश व्यवसायात चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. गोल्ड फिशचे पालन एका छोट्या खोलीमध्येही करता येऊ शकते. जर तुम्हाला गोल्ड फिशचे पालन सुरू करायचे असेल तर त्यासाठी अॅक्वेरियम खरेदी करावे लागेल. मग त्यामध्ये गोल्ड फिशचे सीडस् टाकावे लागतात. विशेष म्हणजे हा व्यवसाय (Agriculture Business) एका छोट्या खोलीतून सुरु करता येऊ शकतो.
सरकारी अनुदान आणि बियाणे कसे मिळवावेत?
भारत सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु करत आहे. मासे पालनापासून बीबियाणांपर्यंत अनेक गोष्टी सरकार शेतकऱ्यांना पुरवत आहे. आता सरकारी योजनेचा लाभ घेणे अतिशय सोपे बनले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. येथे रोजचे बाजारभाव, जमीन मोजणी, आपल्या शेताचा सातबारा उतारा, जमीन खरेदी विक्री यासह अनेक शेतीउपयोगी सेवा विनामूल्य अगदी मोफत देण्यात येतात. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello krushi अँप डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी किती गुंतवणूक लागते? Goldfish Price
सोनेरी माशांचे सीडस्(बीज) खरेदी करताना त्यात मेल(नर) व फिमेल(मादी) सीड असतील, याची खात्री करून घ्या. गोल्डफिश पालनासाठी लागणार्या १०० वर्गफूट अॅक्वेरियमची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे. तसेच इतर साहित्य खरेदीसाठी ५० हजार रुपयांचा खर्च येतो, एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला १ ते अडीच लाख खर्च येऊ शकतो.
पाच महिन्याने उत्पन्न सुरू
गोल्ड फिशचे सीडस् टाकल्यानंतर पाच महिन्यानंतर उत्पन्न सुरू होते. सध्या बाजारात एका गोल्ड फिशचा दर २५०० रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत आहे. अशावेळी तुम्ही गोल्ड फिश विकून चांगले उत्पन्न मिळू शकते. मत्स्यपालनासाठी तलाव किंवा शेततळे गरजेचे असतात. परंतु गोल्डफिश पालन व्यवसायात मोठ्या जागेची गरज नाही. तसेच या व्यवसायात गुंतवणूकही काही खूप मोठी नाही. त्यामुळे काम सुरू करायला हरकत नाही. बाजारात गोल्ड फिशची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांनी गोल्ड फिश पालन व्यवसाय केल्यास त्यांना चांगला नफा मिळू शकतो.