जे सोयाबीन, तुरीबाबत झालं तेच हळदीबाबत होतंय…! शेतकरी चिंताग्रस्त 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला आहे. यात आता हळदीचा ही समावेश झाला आहे नांदेड जिल्ह्यात हळदीवर ‘कंदकुज’ या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  त्यामुळे हळदीचे कंद जमिनीत सडून पीक अकाली वाळत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आहे. शिवाय हळदीच्या एकूण उत्पादनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्याचा विचार करता नांदेड जिल्ह्यात 20 ते 25 हजार हेक्‍टरवर हळद पिकाची लागवड होते. इतर पिकांच्या तुलनेत हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे पाहतात.  परंतु या वेळेला हळदीचे उभे पीक काढणीपूर्वीच वाळून जात असल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. नांदेड जिल्ह्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांसह बागायती पिकाला ही फटका बसला आहे. या पिकाला ही या अतिवृष्टीचा फटका बसल्याचे सध्या दिसून येत आहे.

हळदीवर कंदकुजीचे आरिष्ट

हळदीचे पिकांवर झालेली कंदकूज ही सततच्या पावसामुळे झाली असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हळद हे पीक काडी धरण्याच्या अवस्थेत असताना पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीचे झाड खालून वाळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.  याबाबत अनेक उपाययोजना करूनही पिकावर परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांचे 30 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. हदगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे माहिती आत्माचे हादगाव तालुका व्यवस्थापक खानसोळे यांनी दिली आहे.

शेतकरी मित्रांनो हि माहितीही तुमच्या उपयोगाची :

ऊसात घ्या ‘ही’ आंतरपिके आणि मिळावा डबल फायदा

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार ‘या’ तारखेला जमा होणार

कृषी ड्रोन, CNG ट्रॅक्टर आणि बरंच काही..नागपुरात आजपासून कृषी प्रदर्शन

शेतकरी मित्रांनो, हमीभाव केंद्रावर तूर विक्रीस नेण्यापूर्वी ‘ही’ प्रक्रिया महत्वाची…

पिकांसाठी संजीवनी ठरते “जीवामृत”…! जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!