कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवायचा आहे? मग करा मोत्याची शेती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर, भुवनेश्वर (ओड़ीसा) में मोती की खेती का प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था ग्रामीण भागातील तरुणांनास,  शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मोती उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु देशाच्य इतर राज्यातही या शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था किसान हेल्पलाईन पण मोती पालनचे प्रशिक्षण देत आहे. 

मोतीच्या शेतीसाठी योग्य काळ ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यानचा असतो. साधरण १० रुंद आणि १० फूट खोल मोठ्या आकाराच्या तलावात मोतींची शेती केली जाते. मोती संवर्धनासाठी ०.४ हेक्टरचया छोट्आ तलावात २५ हजार शिंपल्यातून मोतींचे उत्पादन केले जाते.  ही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शिपले खरेदी करावे लागतात. यानंतर प्रत्येक शिपल्यात छोटीशी शल्य क्रिया झाल्यानंतर त्यात चार ते सहा मीमी व्यासवाले डिजाईन बीड सारखे गणेश, बुद्ध, पुष्पाच्या आकाराच्या आकृत्या टाकल्या जातात. त्यानंतर शिपले बंद केले जातात. या शिपल्यात नायलॉन बॅगमध्ये १० दिवसांपर्यंत एंटी-बायोटिक आणि प्राकृतीक चाऱ्यावर ठेवले जाते. दररोज याचे निरीक्षण केले जाते आणि मृत शिपल्यांना काढले जाते. त्या शिपल्यांना तलावात टाकले जाते, त्यांना नायलॉगच्या बॅगेत ठेवून बांबू किंवा बॉटलच्या साहाय्याने लटकवले जाते. 

तलावाच्या एका मीटर आत सोडले जाते. प्रति हेक्टर २० हजार ते ३० हजार सीपच्या दराने यांचे पालन केले जाते.  शिपल्याच्या आतील निघणारा पदार्थ बीडच्या चहू बाजूने लागत असतो. जे शेवटी मोतीचं रुप घेत असते. साधरण ८ ते १० महिन्यानंतर शिपल्याच्या बाहेर येत असते.  एक शिपल्याची किंमत २० ते ३० रुपये आहे. बाजारात एक मिमी ते २० मिमी मोतींचा दाम हा साधरण ३०० रुपये ते १५०० रुपये असतो. सध्या डिझायन मोतींना खूप मागणी असून त्यांना बाजारात खूप दर मिळत असतो. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशात मोतींची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. इतकेच काय शिपल्यांनाही बाजारात मोठी मागणी असते. शिपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जात असतात. शिपल्यांपासून कन्नौजमध्ये परफ्यूम तेलही काढले जाते. यामुळे शिपल्यांना स्थानिक बाजारात विकले जाते. यात अजून एक विशेषता आहे, ती म्हणजे तलावातील पाणी शुद्धीकरणाचे कामही शिपल्यांमुळे होत असते.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –

गाढवाचे दूध 50,100 रुपये लिटर नाही तर चक्क 5000 रुपये किलो ने विकले जाते; जाणून घ्या याबाबत

तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? एका क्लिक वर कसे जाणून घ्याल

किसान क्रेडिट कार्डचे ‘हे’ आहेत मोठे फायदे; जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे याबाबत

सेंद्रिय शेतीतून त्या दोघा भावांनी केली कोटींमध्ये उलाढाल; जाणून घ्या त्यांची यशोगाथा | Satyajit and Ajinkya Hange

कर्ज हवंय? मग प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा घ्या लाभ! असा करा अर्ज..

Leave a Comment

error: Content is protected !!