सौर ऊर्जेवरील कृषी पंपासाठी 50 हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार ; कुठे कराल अर्ज ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषी पंपासाठी चालू आर्थिक वर्षात(२०२२-२३) अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अभियानाअंतर्गत येत असलेल्या पंतप्रधान कुसुम (PM Kusum Solar Pump Yojana) घटक योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी महाऊर्जा च्या पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्याने याबाबतचा आपापला लाभार्थी हिस्सा भरणे अनिवार्य आहे. हा हिस्सा भरण्यासाठीची अंतिम मुदत संपली होती. परंतु यासाठी आता येत्या 31 मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी या मुदतीत ही रक्कम भरावी असा आवाहन महाऊर्जा चे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.

‘या’ जिल्ह्यांचे उद्दिष्ट पूर्ण

सौर कृषी पंप लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम ही ऑनलाइन किंवा धनाकर्ष(DD) द्वारे भरणं आवश्यक आहे. धनाकर्ष द्वारे ही रक्कम भरावयाची असल्यास धनाकर्ष ची प्रत पोर्टल वर अपलोड करावी लागणार आहे. शिवाय महाऊर्जा च्या जवळच्या कार्यालयात हा धनाकर्ष जमा करावा लागणार आहे. या दरम्यान या कृषी पंपाच्या वितरणासाठीचे पुणे, नगर, औरंगाबाद ,बीड ,बुलढाणा ,धुळे ,हिंगोली ,जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक ,उस्मानाबाद, नांदेड, परभणी ,सोलापूर, वाशिम,व यवतमाळ या जिल्ह्यांमधील उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

‘या’ जिल्ह्यांना मिळणार योजनेचा लाभ

दरम्यान राज्यातील उर्वरित अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर ,नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी ,सांगली ,सातारा ,सिंधुदुर्ग ,ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषी पंप उपलब्ध आहेत. या जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांना या कृषी पंपाच्या मागणीसाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!