हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष शेती म्हटले की सर्वप्रथम शेतकऱ्यांना बाग उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक (Success Story) करावी लागते. एंगल्स उभे करणे, काड्या भरणे, ड्रीपची व्यवस्था करणे अशी अनेक तजबीज करावी लागते. मात्र पुण्यातील बारामती तालुक्यात द्राक्ष पिकासाठी योग्य असे वातावरण नसतानाही दोन उच्चशिक्षित भावांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वीपणे द्राक्ष बाग उभी केली आहे. यावर्षी त्यांना 15 टन माल अपेक्षित असून, बाजारभावाप्रमाणे जवळपास 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे देवकाते बंधू सांगतात. बारामती तालुक्यातील द्राक्ष शेतीचा हा पहिलाच प्रयोग (Success Story) आहे.
द्राक्ष शेतीसाठी नोकरीला रामराम (Success Story Of Grapes Farmer Pune)
बारामती तालुक्यातील पिंपळी या गावात सतीश देवकाते आणि दीपक देवकाते (Success Story) हे दोघे भाऊ आपली वडिलोपार्जित शेती कसतात. शेतीत तीच तीच पिके घेऊन योग्य तो नफा मिळत नसल्याचे पाहून त्यांनी काहीतरी नवीन पीक घेण्याचे ठरवले. दीपक देवकाते हे एका महाविद्यालयात शारीरिक शिक्षक निरीक्षक या पदावर नोकरी करत होते. त्यांना पगारही उत्तम मिळत होता. मात्र द्राक्ष शेतीतून अधिक नफा मिळत असल्याने पूर्णवेळ शेतीवर लक्ष केंद्रित करता यावे. आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीत करता यावा. यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. सध्या दोघेही भाऊ पूर्णवेळ द्राक्ष बागेवर लक्ष देत आहेत.
हेही वाचा : नाशिकहून नेदरलँड, रोमोनियाला द्राक्ष निर्यात; पहिली खेप रवाना! (https://hellokrushi.com/grapes-export-from-nashik-netherlands-romania/)
कोणत्या जातीची निवड
देवकाते बंधूंनी अडीच एकरात द्राक्ष बाग उभी केली असून, यात त्यांनी दीड एकर क्षेत्रात आर.के तर एक एकर क्षेत्रात कृष्णा या व्हरायटीची द्राक्ष लागवड केली आहे. बारामती तालुक्यात साधारपणे ऊस हे प्रमुख पीक असून, काही शेतकरी गहू, ज्वारी, बाजरी, मका ही पारंपरिक पिके देखील घेतात. बारामती आणि आसपासच्या परिसरात द्राक्ष शेती होत नसल्याने दोघाही भावांनी प्रथम द्राक्ष शेतीबाबत सर्व माहिती मिळवली. त्यानंतर द्राक्ष लागवडीचा निर्णय पक्का केला. याच माहितीच्या आधारे ते गेले पाच वर्ष द्राक्षाचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. यात त्यांनी गेल्या तीन ते चार हंगामात आर.के या व्हरायटीची द्राक्ष विदेशात दुबई, जर्मनी, स्पेन या देशांमध्ये एक्स्पोर्ट देखील केली आहे. चालू वर्षी ते आपला माल पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्यांना आणि केरळ येथील व्यापाऱ्यांना पाठवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार राबविणार ‘ही’ योजना! (https://hellokrushi.com/wine-industry-promotion-scheme-grapes-farmers/)
15 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा
दीपक देवकाते सांगतात, यावर्षी अवकाळी पावसाचे संकट आले असतानाही आपण दोन्ही प्लॉट व्यवस्थितरित्या व्यवस्थापित केले असून, आपल्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे. आपल्याला दीड एकर क्षेत्रात लागवड केलेल्या आर.के व्हरायटीपासून आणि एक एकरात कृष्णा या द्राक्ष व्हरायटीपासून एकत्रितपणे 15 टन माल मिळण्याची अपेक्षा आहे. यातून सध्या पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या बाजार भावाप्रमाणे विचार करता आपल्याला तीन एकरात जवळपास 12 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.