Wild Animals : जंगली प्राणी पिकांची नासाडी करताय? वापरा ‘हा’ जुगाड; होईल दुप्पट फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बऱ्याच भागात शेतकरी जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) आपल्या शेतात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे खुप त्रस्त असतात. हे प्राणी पिकांचे पूर्णतः नुकसान करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, आज आम्ही तुम्हांला शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आलेला एक सर्वोत्तम उपाय सांगणार आहोत. ज्याचा अवलंब तुम्ही केल्यास रानडुक्कर, हरीण, रानगवा आणि नीलगाय हे जंगली प्राणी (Wild Animals) तुमच्या शेताजवळ फिरकणार देखील नाही. चला तर मग पाहूया नेमका हा उपाय काय आहे.

कोणताही अतिरिक्त खर्च नाही (Wild Animals Damage Crops)

शेतकऱ्यांना शेतात कोणतेही काम करायचे म्हटले की सर्वात पहिला प्रश्न मनात निर्माण होतो की त्यासाठी नेमका खर्च किती येणार? तर तुम्हांला जंगली प्राणी (Wild Animals) आपल्या शेतात येऊ नये. यासाठी जो उपाय करायचे आहे त्यासाठी कोणताही खर्च येणार नाही. तुम्हाला एखाद्या पिकाची लागवड करण्याआधी आपल्या शेतात चोहीबाजूने बांधाला सूर्यफुलाची लागवड करायची आहे. विशेष म्हणजे सूर्यफुलाचे बियाणे तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे. याशिवाय तुम्हाला सूर्यफुलाच्या लागवडीतून उत्पन्न देखील मिळणार आहे. आणि तुमच्या शेतातील पिकांचे जंगली प्राण्यापासून संरक्षण देखील होणार आहे.

हेही वाचा : जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होतीये; वापरा ‘हा’ गोमुत्राचा जुगाड! (https://hellokrushi.com/wild-animals-crops-destroyed-use-gomutra-jugad/)

शेतकऱ्याच्या अनुभवातून सल्ला

जंगली प्राण्यांपासून पीक संरक्षण करण्यासाठी बांधावर सूर्यफुलाची लागवड हा पूर्णतः शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आलेला उपाय आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा प्रभावी वापर करू शकतात. एका शेतकऱ्याने आपल्या गहू पिकाच्या संरक्षणासाठी बांधावर सूर्यफूल लागवड केल्याने, त्याच्या शेतात जंगली प्राण्यांचा झालेला सुळसुळाट पूर्णतः थांबला. यांनतर तो शेतकरी आपल्या शेतात नेहमी पिकांची लागवड करताना या तंत्राचा वापर करत आहे. ज्यामुळे त्याला जंगली प्राण्यांपासून आपले पीक वाचवण्यात पूर्णतः यश आले आहे. सध्या त्याच्या शेताकडे बांधावरील सूर्यफुलामुळे जंगली प्राणी फिरकत देखील नसल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा : पिकांमध्ये जंगली प्राण्यांचा हैदोस वाढलाय; करा ‘हा’ घरगुती उपाय! (https://hellokrushi.com/wild-animals-attacks-on-crops-do-this-remedy/)

होईल दुपट्ट फायदा

या शेतकऱ्याने म्हटले आहे की, तीन एकरमध्ये दरवर्षी रब्बी हंगामात गहू पेरणी करायचो. मात्र, जंगली प्राणी आपले पीक व्यवस्थित येऊन देत नव्हते. त्यामुळे आपण हा अनोखा प्रयोग गेल्या काही वर्षांपासून करत आहोत. ज्यामुळे सध्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील या प्रयोगाच्या वापरातून फायदा झाला. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या शेतात जंगली प्राण्यांचा त्रास होत असेल. तर हा उपाय नक्की आजमावून पहा. ज्यामुळे तुमचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला बांधावर सूर्यफुलाची लागवड केल्यानंतर त्याद्वारे देखील उत्पन्न मिळणार आहे. अर्थात या उपायामुळे शेतकऱ्यांना दुपट्ट फायदा होऊ शकतो.

error: Content is protected !!